अंड्यांवरही आता एक्सपायरी डेट दिसणार.1 एप्रिलपासून नियमाची अंमलबजावणी होणार.प्रत्येक अंड्यावर एक्स्पायरी डेटचा स्टँप बंधनकारक होणार.ज्या अंड्यांवर स्टँप नसतील ती नष्ट करावी लागतील किंवा खाण्यासाठी योग्य नाही असे समजले जाणार.कोंबडीने अंडं दिल्यापासून 30 डिग्री सेल्सियसपर्यंतच्या तापमानात स्टोअर केल्यास 2 आठवड्यापर्यंत ते खाण्यायोग्य असतं.2 ते 8 डिग्री सेल्सियसपर्यंतच्या तापमानामध्ये स्टोअर केल्यास ते 5 आठवड्यापर्यंत खाण्यायोग्य मानले जाते.उत्तर प्रदेशमध्ये 1 एप्रिलपासून एक्स्पायरी डेट असलेली अंडी मिळणार.