न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने शासकीय मदत नाकारली आहे. दहा लाखांचा चेक घेऊन तलाठी आणि मंडळ अधिकारी आले होते. मात्र कुटुंबियांनी हा चेक घेण्यास नकार दिला. सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही आर्थिक मदत घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.