भाजपाचे नेते तथा माजी मंत्री पद्माकर वळवी पुन्हा पक्ष बदलण्याची शक्यता आहे. पद्माकर वळवी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लढवण्याच्या वेळेस इच्छा व्यक्त केली आहे. परंतु एखाद्या पक्षाने मला तिकीट दिलं तर मी त्या पक्षातून निवडणूक लढणार असे संकेत पद्माकर वळवी यांनी दिले. मला चांगली संधी मिळाली तर त्या संधीचा मी फायदा घेणार असेही त्यांनी म्हटलंय.