निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी. चुकले आमचे काही तर क्षमा असावी. अकरा दिवस आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज बाप्पांना निरोप दिला जातोय. पुढच्या वर्षी लवकर या असं वचन घेऊनच भाविक गणेशाला निरोप देतायत. सार्वजनिक गणेश मंडळातले गणपती आज मंडपाबाहेर पडतील. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर. यासह संपूर्ण महाराष्ट्रभरात भव्य विसर्जन सोहळा पार पडेल.