मलेशियाच्या पंतप्रधानांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.अन्वर इब्राहिम यांनी शनिवारी नवी दिल्लीत BRICS परिषदेच्या डिनरमध्ये किशोर कुमार यांचे प्रसिद्ध गाणे ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत...’ आणि मुकेश यांचे ‘दोस्त दोस्त ना रहा...’ हे गाणे गाऊन सर्वांचं लक्ष वेधलं. मलेशियन पंतप्रधान किशोर कुमारचे चाहते आहेत. त्यांनी 2024 मध्ये भारतात एका मुलाखतीतही हेच गाणे गुणगुणले होते. याशिवाय, फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्यात त्यांनी एक अधिकृत व्हिडिओ शेअर केला होता. यात ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘बोले चुडिया’ वापरण्यात आले होते.
Malaysian Prime Minister fan of Kishore Kumar