गेले वर्षभर सीरियामध्ये नव्या सरकारचा कारभार सुरु होता. २०२४च्या डिसेंबरमध्येच तिथं १४ वर्षांच्या गृहयुद्धाचा शेवट झाला आणि तिथं एचटीएस या बंडखोर गटानं सत्ता उलथवून सीरियावर ताबा मिळवला. मात्र वर्षभरात तिथं काही छोट्या मोठ्या जमातींसह नव्या सरकारचे संघर्ष झालेच. आतातर थेट अमेरिकेनं तिथं हल्ला केलाय. परिणामी काही दिवसांतच सीरियातून दीड लाख लोकांनी घरं सोडली आहेत. आठवडाभर सीरियामध्ये नेमकं काय घडतंय याचा मागोवा घेऊया या रिपोर्टमधून...