इराणमधल्या आंदोलनांनी अमेरिकेचं लक्ष वेधून घेतलंय इतकं की एकीकडे लष्करी कारवाईचा इशारा देतानाच आता ट्रम्प यांनी त्यांचा आवडता एक्का ही बाहेर काढला. ट्रम्प यांनी इराणला टॅरिफची धमकी दिलीय. आणि त्याचा फटका भारताला बसण्याची शक्यता अधिक आहे. मात्र त्याचवेळी या धमकीमुळे फार काही बिघडेल असं वाटत नाही कारण ट्रम्प धमकी येताच भारत ज्या ज्या वस्तूंची इराणला निर्यात करतो त्या वस्तूंचे शेअर्स वाढलेत. पाहूया नेमकं काय घडलंय.