पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी मुद्दा होता तो कच्चे तेल आणि गॅसचा. रशिया-यूक्रेन युद्धानंतर जगाचे संबंध ह्या एका मुद्द्यामुळे बदलत गेलेत. भारतानं रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅसची आयात करुन एकप्रकारे यूक्रेनच्याविरोधात रशियाला मदत केल्याचा आरोप युरोपियन देश करत आलेत. त्याचपार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी आता भारताला अमेरिकेचं ग्राहक बनवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. त्याला किती यश येईल हे आगामी काळात स्पष्ट होईल पण पुढच्या काही काळात अमेरिका-भारत संबंधात हाच प्रमुख मुद्दा राहिल असं दिसतंय