- सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल 14 हजार रुपयांची घसरण झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे दर 1 लाख 46 हजार प्रति 10 ग्रॅम , तर चांदीचे दर 2 लाख 10 हजार प्रति किलो वर आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिकेतील महागाईची आकडेवारी आणि व्याजदरांबाबतची अनिश्चितता यांचा परिणाम मौल्यवान धातूंच्या दरांवर होत आहे. तसेच अमेरिकेत व्याजदर आणखी वाढण्याची शक्यता आणि डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्या-चांदीवरील दबाव वाढल्याने सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचा अंदाज सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.