Mira-Bhayandar मारहाण प्रकरण, राजकीय संघर्ष पेटला; मेहतांनी आयुक्तांवर दबाव आणला,सरनाईकांचा आरोप

मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेतील मारहाण प्रकरणावरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. या प्रकरणात भाजपच्या 16 नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी जाऊन दबाव आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. आयुक्तांच्या निवासस्थानी साडेतीन तास नेमके काय घडले याची चौकशी करण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून नरेंद्र मेहता यांची आमदारकी रद्द करण्याचीही मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहत मागणी केलीय.. त्यामुळे मिरा-भाईंदरमधील हे प्रकरण आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आले आहे.

संबंधित व्हिडीओ