लखनऊमधील शिवा शर्मा मृत्यूप्रकरणातील आरोपी मॉडेल श्रद्धा दुबे हिला उत्तर प्रदेश एसटीएफने नागपुरातून अटक केली आहे. नागपूर-वर्धा रोडवर ही कारवाई करण्यात आली. सूत्रांनी तिच्या अटकेला दुजोरा दिला आहे.
श्रद्धा दुबे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होती. तिच्याबाबत माहिती देणाऱ्यास पोलिसांनी ५० हजारांचे बक्षीसही जाहीर केले होते. नागपूर गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने काल रात्रीपासून तिचा शोध घेत होते. अखेर संयुक्त कारवाईत तिला पकडण्यात यश आले.