आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. त्यातच आत्तापासूनच उमेदवार जाहीर केले जात असून त्यामध्ये आता महायुतीने आघाडी घेतलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार काल कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केलेली आहे.