वाशिम शहरातील संपूर्ण ओला आणि सुका कचरा हिंगोली नाका परिसरातील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात आहे.मात्र या डंपिंग ग्राऊंडला वारंवार आग लागत असल्याने दुर्गंधीसह धुराचे लोट हवेत पसरतायत.त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत आहे. यासंदर्भात डंपिंग ग्राउंड परिसरातून आढावा घेऊन नागरिकांशी संवाद साधलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी...