Sindhurdug| मालवणच्या तोंडवळी समुद्रकिनाऱ्यावर वाळूचा भाग खचला, याचाच NDTV मराठीने घेतलेला आढावा

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर हवामानात झालेले मोठे बदल दिसून येत आहेत. मान्सूनचे आगमन काही दिवसांवर असताना समुद्रात मोठे बदल दिसून येत आहेत. मालवणच्या तोंडवळी समुद्र किनाऱ्यावर मोठ्याप्रमाणात वाळूच्या ढिगा-याला भेगा पडलेल्या दिसून येत आहेत. समुद्रातील हालचाली व वाऱ्याच्या वेगामुळे अशा प्रकारची स्थिती निर्माण होत असल्याचे स्थानिक मच्छीमार सांगतात. वर्षातून दोन ते तीन वेळा अशा प्रकारे किनाऱ्यावर भेगा पडून वाळूचा मोठा भाग समुद्र गिळंकृत करतो व पुन्हा आठ ते दहा दिवसांत पुन्हा पूर्वीसारखाच किनारा वाळूने भरून जातो अशा प्रकारची माहीती ही मच्छीमार देतात.याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी.

संबंधित व्हिडीओ