हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनांमुळे आतापर्यंत 78 लोकांचा मृत्यू झाला आहे.37 लोक अद्याप बेपत्ता आहेत आणि 115 लोक जखमी झाले आहेत...हिमाचल प्रदेशात 2 राष्ट्रीय महामार्गांसह 243 रस्ते बंद आहेत, 278 वीज ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत आणि 261 पाणीपुरवठा प्रकल्प ठप्प झाले आहेत.दरम्यान, हवामान खात्याने आज सिरमौर, कांगडा आणि मंडी येथे रेड अलर्ट जारी केला आहे, तर शिमला, सोलन, हमीरपूर, बिलासपूर, ऊना, कुल्लू आणि चंबा या 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.