Manoj Jarange Patil यांच्या 'चलो मुंबई'च्या आंदोलनाचा कसा असणार मार्ग | NDTV मराठी

29 ऑगस्टला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी दाखल होणार आहेत.. त्यापार्श्वभूमीवर ते राज्यभरातील मराठा कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत चर्चा करतायत...आज त्यांनी बीडमध्ये सभा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका करत इशारा दिलाय. सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात, पण जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय. फडणवीसांच्या घरासमोरच आंदोलन करु असा इशारा जरांगेंनी दिलाय. याशिवाय सत्ता येत असते, ती बदलत असते हे लक्षात ठेवा असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. मात्र जाळपोळ, दगडफेक करायची नाही असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय.

संबंधित व्हिडीओ