रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत बांग्लादेशी नागरिकांचं वास्तव्य आढळून आलं आहे. या प्रकाराची गंभीर दखल पोलिसांकडून घेण्यात आली असून झोपडपट्ट्या पोलिसांच्या रडारवर आहेत. शहरातील झोपडपट्टी भागात अवैधरित्या बांग्लादेशी नागरिकांचं वास्तव्य असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील झोपडपट्टी भागात संशयितांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच बांग्लादेशी नागरिक आढळून आल्यास त्याला मदत करणाऱ्यांना सहआरोपी केलं जाईल असा इशाराही जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिला आहे..