भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आलेले इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियान्तो यांनी त्यांचे भारताशी असलेले संबंध उलगडले. सुबियान्तो यांच्या सन्मानासाठी आयोजित स्नेहभोजना दरम्यान त्यांनी आपल्यात भारतीय डीएनए असल्याचं सांगितलं. जेव्हा केव्हा भारतीय संगीत ऐकतो तेव्हा माझं मन-तन डोलायला लागतं असं त्यांनी म्हटलंय. यावेळी राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. सुबियान्तो यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वगुणाचंही कौतुक केलं.