इराणचे नवे सुप्रीम लीडर मृत्यूच्या दाढेतून कसे परतले त्याची खळबळजनक माहिती समोर आलीय. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मोज्तबा खामेनी हे अगदी थोडक्यात बचावल्याची माहिती मिळतेय. त्यांचे वडील आणि माजी सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनींसह अनेक टॉप लीडर तसंच कुटुंबातल्या अनेक सदस्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. मात्र एका लीक झालेल्या ऑडिओ क्लीपमधून खळबळजनक माहिती समोर आलीय. द टेलिग्राफने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 28 फेब्रुवारी रोजी ब्लू स्पॅरो मिसाईलने सुप्रीम लीडरच्या निवासस्थानावर हल्ला झाला. तेव्हा काही मिनिटं आधीच मोज्तबा खामेनी हे घराबाहेर बागेत फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. काही पावलांच्या अंतरामुळेच ते वाचले. मात्र घराचा ढिगारा अंगावर पडल्यानं ते जखमी झाले.