गॅस सिलेंडर टंचाईचा परिणाम आता धार्मिक उत्सवांवरही पाहायला मिळत असून महाप्रसादासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्याने भुसावळ येथील हिंगलाज देवीच्या मंदिरात प्रगट सोहळा हा महाप्रसादाविना करावा लागला आहे. हिंगलाज देवी ही भावसार समाजाची कुलदैवत मानली जाते मात्र हिंगलाज देवीचे मूळ स्थान हे बलुचिस्तान मध्ये असल्याने स्थानिक मंदिरांमध्येच भावसार समाज मोठ्या उत्साहात प्रगट दिवस हा साजरा करतात मात्र यावर्षी महाप्रसादासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्याने प्रथमच महाप्रसादाविना हा उत्सव साजरा करावा लागला आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..