Jalna Drought|आल्याचं पीक वाचवण्यासाठी टँकरच्या पाण्याचा आधार;टँकरचा वाढता खर्च,दुहेरी संकटात शेतकरी

मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.. जालन्यातील किनगावमध्ये अद्रक उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय..शेतकरी सुभाष बारवाल यांनी अडीच एकरावर अद्रकाची लागवड केली.. केवळ रोपांसाठी अडीच लाख रुपये खर्च केले. मात्र पाऊस नाही.. भूगर्भातील पाणीही आटलंय. त्यामुळे पीक वाचवण्यासाठी आता टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय.. रोज 24 हजार लिटरचे तीन टँकर शेतात आणावे लागतायत.. आतापर्यंत पाण्यासाठीच तब्बल दोन लाख रुपये खर्च झालेत.. पीक हाती येईपर्यंत आणखी किमान दोन लाख रुपये खर्च होण्याची शक्यता आहे..एवढा खर्च करून अद्रक वाचलं, तरी बाजारात भाव किती मिळणार याची शाश्वती नाही. त्यामुळे दुष्काळात पीक वाचवायचं की वाढता खर्च थांबवायचा, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकलाय. Drought in Jalna: Farmers rely on water tankers to save their ginger crops; rising tanker costs lead to a double crisis for farmers.

संबंधित व्हिडीओ