बारामती नगरपरिषद नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा आहे. पक्षांतर्गत संघर्ष टाळण्यासाठी त्यांना संधी दिली जाऊ शकते.