कल्याणमधील नामांकित के. डी. रेसिडेन्सी हॉटेलमध्ये परवानगीविना आयोजित करण्यात आलेल्या मोठ्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. पार्टी सुरू असताना पोलिसांनी कारवाई करत हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या जवळपास 65 तरुण तरुणींना ताब्यात घेतले. काही तरुण करून फरार झालेत. हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली; मात्र छाप्यादरम्यान पोलिसांना ड्रग्स सापडले नसल्याचे समोर आले आहे.
Kalyan | Police raid Hotel K. D. Residency; case registered against 7 organizers over an illegal party.