वाढत्या जल प्रदूषणामुळे राज्यात अनेक ठिकाणी नद्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. खेड तालुक्यातून वाहणारी भीमा नदीही अशीच प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. परिणामी आसपासच्या गावातील नागरिकांना दूषित पाणी पिल्याने अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या नदीवर अवलंबून असलेल्या अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांमधून त्या भागातील नागरीकांना पिण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. जलपर्णीच्या विळख्यातून ही नदी वाचविण्यासाठी आता ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.