खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथे कोकाकोला कंपनी उभारणीचं काम सुरू आहे. या कंपनीत स्थानिक तरुणांना प्राधान्य न देता परप्रांतियांना सामावून घेतल्याच्या निषेधार्थ शिंदे शिवसेनेने कंपनीत हंगामा करत कामच बंद पाडलं. कंपनीतील परप्रांतियांना हुसकावून बाहेर काढत कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. जोपर्यंत स्थानिकांना सामावून घेण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कंपनीचे काम बंदच राहिल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.