गणपतीसाठी जाणाऱ्या कोकणवासियांना टोल माफ असल्याची माहिती सरकारकडून मिळाली होती.. मात्र कोकणवासियांना नक्की टोल माफ केलाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.त्याचं झालं असं की कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या फास्टटॅगमधून टोल नाक्यावर पैसे कट झाल्याचं निदर्शनास आलं. टोलनाक्याच्या काचेवरची टोल फ्री ची पावती लावली असताना देखील काही जणांचे पैसे कट झालेत.. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जातोय...