शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात आज राज्यव्यापी बैठक पार पडली. या बैठकीनंतर कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी ठेवली आहे. राज्यात कंत्राटदरांची बिले थकली आहेत, लाडक्या बहिणींची मतासाठी फसवणूक झालीये त्यामुळे सगळं पाहता सरकार जनतेची फसवणूक करत आहे असा आरोप देखील सतेज पाटील यांनी केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी.