गणेशोत्सव सुरू होण्यासाठी आता अवघे दोन दिवस उरलेत..त्यापूर्वी लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन झालंय... लालबागच्या राजाची पहिली झलक पाहण्यासाठी भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय.. यावेळी लालबागच्या राजाचा मुकुट हा आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरूपती बालाजीच्या राज मुकुटात बसवण्यात आला आहे. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे. लालबागच्या राजाची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे. लालबागच्या राजाची सुवर्ण पाऊलं ते सुवर्ण राज मुकुट असा राजेशाही थाट आपल्याला लालबागच्या राजाचा पहायला मिळतोय. यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल 50 फूटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.