लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवतेय... काही पेट्रोल पंपांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजारात इंधन विक्री केल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कारवाई करत जिल्हा प्रशासनाने अवैधरित्या खुल्या बॉटल आणि बॅरलमध्ये डिझेल विक्री करणाऱ्या दोन पंपांचे परवाने निलंबित केले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या दोन्ही पंपांना इंधन पुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, इंधन टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शेतीकामे कशी करावीत असा सवाल उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी घेतला आहे.