Maharashtra By-Election| महाराष्ट्रातील पोटनिवडणुका जाहीर; बारामती, राहुरीत 23 एप्रिलला मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झालीय. तर महाराष्ट्रातील पोटनिवडणुकाही जाहीर झाल्यात. बारामती आणि राहुरीत 23 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल लागणारय. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झालं. यामुळं बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झालीय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जागेवर लढणार आहेत. तर राहुरीच्या जागेवर माजी आमदार प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत.

संबंधित व्हिडीओ