Maharashtra| मद्यविक्री परवान्यात नेत्यांच्या घरचेच लाभार्थी, BJP,NCP नेत्यांच्या घरातल्यांना परवाने

विविध लोकप्रिय घोषणांची अंमलबजावणी करताना राज्याच्या तिजोरीवर येणारा भार कमी करण्यासाठी सरकारने ४१ मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे ३२८ नवे परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यातील ९६ परवाने हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांशी संबंधितांच्याच झोळीत पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सर्वाधिक परवाने हे भाजप नेत्यांच्या संबंधितांना मिळणार असून त्याखालोखाल दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे निकटवर्तीही याचे 'लाभार्थी' ठरणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या सदानंद बापट यांच्या 'अॅडलर्स बायो एनर्जी' आणि 'असोसिएटेड ब्लेंडर्स' या कंपन्याना परवाने मिळतील. नव्याने परवाने मिळणार असलेल्या ४१पैकी १६ कारखाने बंद असून काहींनी केवळ परवान्यांच्या लाभासाठी नावापुरते कारखाने सुरू ठेवले आहेत. या सर्वांच्याच वाट्याला नवे परवाने येणार आहेत. हे नवे परवाने एक कोटी रुपयांमध्ये मिळणार असून ते भाडेकरारावर देण्याचीही असल्याने मद्य उद्योजकांना मोठा आर्थिक लाभ होणार असल्याची चर्चा आहे.

संबंधित व्हिडीओ