राज्यात पाणी टंचाईची चाहूल आतापासूनच जाणवायला सुरवात झालीय.राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्रातील 626 गाव-वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय.एप्रिलच्या सुरुवातीलाच राज्यातील टँकरचा आकडा शंभरीपार गेला आहे.पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 178 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ज्यात सर्वाधिक टँकर सातारा जिल्ह्यात सुरू आहेत.