PM Modi दोन दिवसीय थायलंड दौऱ्यावर, थाय रामायण पाहून पंतप्रधान मोदी भारावले | NDTV मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर आहेत. थायलंडमध्ये सहाव्या बिम्सटेक शिखर परिषदेत मोदी सहभागी होतील.. या दौऱ्याच्या निमित्ताने भारत आणि थायलंड या दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील अशी आशा व्यक्त केली जातेय. मोदी बिम्सटेक शिखर परिषदेत थायलंड, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आणि भूतानच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी यांचे थायलंडमध्ये जंगी स्वागत झाले. याच स्वागताचा एक भाग म्हणून नरेंद्र मोदी यांचे स्वागत थायलंडचे ‘रामकियेन’ या महाकाव्यच्या सादरीकरणाने करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान थायलंडमधील विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम आणि थायलंडच्या पारंपरिक 'खोन' नृत्याचे मिश्रण करून 'रामकियेन' कथेवर आधारित एक विशेष सादरीकरण करण्यात आलं.

संबंधित व्हिडीओ