राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली असली. तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता डिसेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता असल्यामुळे हे अधिवेशन नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.