Manoj Jarange यांच्याकडून दसरा मेळाव्याची घोषणा; Eknath Shinde यांच्यावर बोलणं टाळा, शिवसेनेचा इशारा

बीडच्या नगद नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा २० ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असतानाच आता शिवसेना शिंदे गटाने विरोधाची भूमिका घेतली आहे. एकीकडे बीड जिल्हा भीषण दुष्काळाच्या संकटात होरपळत असताना मेळाव्याच्या आयोजनावरून राजकीय वातावरण तापलंय. शेतकऱ्यांसाठी काही करता आलं तर करा, पण मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा नको, अशी भूमिका शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी मांडली आहे. एवढंच नाही, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलाल तर जशास तसे उत्तर दिले जाईल.मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे सहकारी तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख स्वप्निल गलदार यांनी दिलाय.. त्यामुळे जरांगे पाटलांच्या मेळाव्याआधीच बीडमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. Manoj Jarange announces Dussehra rally; Shiv Sena warns against speaking about Eknath Shinde.

संबंधित व्हिडीओ