Manoj Jarange आणि Ramdas Kadam घेणार पत्रकार परिषद, दोघे काय बोलणार याकडे लक्ष | NDTV Marathi
Manoj Jarange and Ramdas Kadam to hold a press conference; all eyes on what they will say
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सकाळी ११ वाजता अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. नारायणगड येथील दसरा मेळाव्यात जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. याबाबत ते आज पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करणार आहेत. दुसरीकडे, शिवसेना नेते रामदास कदम यांची कांदिवली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांना रामदास कदम प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत रामदास कदम नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.