मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजासोबत मुंबईकडे कूच करणार आहेत. यावरुनच भाजप आमदार यांनी जरांगे पाटलांवर सडकून टीका केलीय.. जरांगे पाटलांच्या वक्तव्यावरुन ते मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करत नाही.. असा आरोप परिणय फुकेंनी केला.जसं पावसाळ्यात बेडकं बाहेर येतात तसे निवडणुका आल्या की जरांगे बाहेर पडतात असं म्हणत फुकेंनी जरांगे पाटलांना टोला लगावला.