जालना- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुबंईत आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. 27 ऑगस्टला अंतरवाली सराटी या ठिकाणाहून जरांगे पाटील मुबईच्या दिशेने निघणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील यांची महत्वाची पत्रकार परिषद अंतरवाली सराटी या ठिकाणी होईल.