दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान गोरक्षणाबाबत वक्तव्य केले होते यावर आता हिंदुत्ववादी संघटनांकडून आक्षेप घेतला जातोय. प्रखर हिंदुत्ववादी तसेच गोसेवा संघाचे मिलिंद एकबोटे यांनी अजित पवारांना जनाची नाही तर मनाची लाज आहे की नाही असा सवाल उपस्थित करत टीका केलीय. लोकसभेला एकच जागा मिळाली आहे. आणि आता मोदींच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री पद मिळाले आहे याची जाणीव पवारांनी ठेवावी अशीही टीका एकबोटेंनी केलीय.