शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा मोठा दावा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलाय.. शिरसाट यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई होत नसल्याचा आरोपही जलील यांनी केला. भाजपमध्ये जाण्याची तयारी सुरू असल्यामुळेच त्यांना संरक्षण मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.