Pune Shivajinagar Court Firing | फायरिंग, आरडाओरड,पळापळ; हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती गंभीर

पुणे शहर आज दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटनेने हादरलंय. शिवाजीनगर कोर्टाबाहेर मंदार किवळे नावाच्या आरोपीवर सहा जणांनी हल्ला केला. आरोपींनी किवळेवर पिस्तुलाने गोळीबार केला.. यानंतरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी मंदार किवळेवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व थरार कोर्टाच्या परिसरात घडत होता. हल्ल्यानंतर आरोपींनी पळ काढला. दुसरीकडे पुणे पोलिसांकडून हल्लेखोरांचा सुरू आहे.. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय.. याशिवाय पोलिसांनी आठ आरोपींची ओळख पटवली आहे.अक्षय चव्हाण,अमोल चव्हाण,पप्पू चव्हाण,सुभाष चव्हाण,बाब्या पवार,रोहन कानगुडे,गणेश चव्हाण,यानप्या अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचं काम करतेय.. घटनास्थळावरून मोबाईल, बंदुका, मॅगझिन्स ताब्यात घेतले आहेत..

संबंधित व्हिडीओ