MSRTC News| 22 मे पर्यंत इलेक्ट्रिक बस पुरवा अन्यथा...; ST महामंडळाचा ईव्ही ट्रान्स कंपनीला इशारा

एसटी महामंडळाने ईव्ही ट्रान्स कंपनीला इशारा दिलाय.22 मे पर्यंत इलेक्ट्रिक बस पुरवा अन्यथा कंत्राट रद्द करू असा इशारा एसटी महामंडळाने दिलाय.करारानुसार बस पुरवठा होत नसल्याने कंत्राट रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.22 मे 2025 पर्यंत 1 हजार 287 ईव्ही बस पुरवण्याचा आदेश एसटी महामंडळाने दिलाय.महामंडळ आणि कंपनीमध्ये 2 वर्षांत 5 हजार 150 बस पुरवठ्याचा करार करण्यात आला आहे.या करारानुसार महिन्याला 215 बस महामंडळास देणं अपेक्षित आहे.जानेवारी 2025 पर्यंत ईव्ही ट्रान्सकडून 1 हजार 935 बस येणं अपेक्षित होतं.पण गेल्या सहा महिन्यांत एकही गाडी एसटीच्या ताफ्यात दाखल नाही.त्यानंतर आता एसटी महामंडळाने कंपनीला कडक शब्दात इशारा दिला आहे.

संबंधित व्हिडीओ