Farmers News | शेतकऱ्यांचे नुकसान टळणार, महसूल विभाग करणार वारसदारांच्या नोंदी | NDTV मराठी

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे वारस नोंदणी न झालेल्या सातबारांमध्ये आता महसूल वारसदारांच्या नोंदी करणार आहे. याद्वारे मृत सातबारा 'जिवंत' करण्यात येणार आहे.शेतकरी मरण पावल्यानंतर त्यांच्या वारसदारांमध्ये शेती आणि मालमत्तेच्या वाटणीवरून वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.वारसदारांची संख्या अधिक असल्यास सामोपचाराने वाटप होऊ शकले नाही.या एकमेव कारणामुळे राज्यातील शेकडो एकर शेतजमीन मृत शेतकऱ्यांच्या नावावर आहे.राज्यातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या नावावर नियमानुसार जमिनींची नोंदणी करणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

संबंधित व्हिडीओ