राज्यभरात होळी सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत.कोल्हापूरातल्या राधानगरीमध्ये सुद्धा असे एक गाव आहे जिथे हा सण आजही जवळपास एक आठवडा साजरा केला जातो.हे गाव आहे राधानगरी तालुक्यातील लिंगाचीवाडी.इथे विविध खेळ खेळण्याची परंपरा आहे. यामध्ये वेशभूषा परिधान करून तरुण गावातून फेरी मारतात. स्वच्छतेचा संदेश देणारे खेळ, लगोरी, कबड्डी असे खेळ यामध्ये असतात. आठवडाभ्र विविध पद्धतीने हा सण सुरूच असतो. शिमग्याचा शेवट म्हणजे खेळोत्सव असतो. त्यामुळे होळीच्या या सणाला गावात मुंबई, पुण्याचे चाकरमानी हा सण साजरा करण्यासाठी आलेले असतात.यासंदर्भात गावकऱ्यांशी बातचीत केलीय विशाल पुजारींनी