मुंबईकरांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर आता अरबी समुद्रातून उपाय शोधला जात आहे...वाढती लोकसंख्या, मर्यादित जलसाठे आणि दरवर्षी वाढणारी पाण्याची मागणी यामुळे तलावांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने खारे पाणी गोड करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती दिली आहे....गोराई आणि वर्सोवा येथे उभारल्या जाणाऱ्या डी-सॅलिनेशन प्रकल्पांमधून २०३१ पर्यंत दररोज तब्बल ६०० दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होणार आहे...सध्या मुंबईत दररोज सुमारे १,६६५ दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता भासत असताना या प्रकल्पामुळे पाणीटंचाईचा मोठा प्रश्न काही अंशी सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.....