मुंबई गोवा महामार्ग आणि त्याची दुरवस्था यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार देखील वैतागले आहेत. मुंबई गोवा महामार्गाला साडेसाती लागली असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरवर्षी गणेशोत्सव आला की आम्ही सांगतो लवकरच करू पण तो काही पूर्ण होत नाही. नितीन गडकरी यांनीही यासाठी प्रयत्न केले. पण कधी चुकीचा ठेकेदार तर कधी वेगवेगळ्या अडचणीमुळे रस्त्याचे काम रखडले. तो लवकरच पूर्ण करू असंही त्यांनी स्पष्ट केलं.