सोन्या चांदीच्या भावात गेल्या महिन्याभरात चढ-उतार कायम आहेत. मात्र अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरीफमुळे सोन्या-चांदीच्या भावावरही परिणाम झालाय.. दोनच दिवसात सोन्याच्या भावात दोन हजार रुपयांची वाढ झाली असून सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या भावातही एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत जीएसटीसह सोन्याचे भाव 1 लाख 2 हजार 485 रुपयांवर पोहोचले असून जीएसटी सह चांदीचे भाव 1 लाख 14 हजार 330 रुपयांवर पोहोचले आहे.