नालासोपारा पूर्वेच्या आचोळे वसंत नगरीत अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली जाणार आहे.यापूर्वी 41 अनधिकृत इमारतीपैकी 6 इमारती तोडण्यात आल्या आहेत. उर्वरित 34 इमारतींवर 23 जानेवारीपासून तोडक कारवाई सुरू झाली.पोलिसांकडून रहिवाशांना जबरदस्तीने घराबाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे. आचोळे वसंत नगरी येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. यावेळी इमारतींमधील रहिवाशी आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळाली.