अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबार प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे.या हल्ल्याचा कट रचल्यापासून तब्बल दोन महिने आधीच आरोपी ऋतिकने स्वतःची ओळख लपवण्याची तयारी सुरू केल्याचं उघड झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याने आपली ओळख सहज पटू नये यासाठी ऋतिकने पूर्ण मुंडण केलं होतं... मुंबईत येण्यापूर्वी त्याचे केस लांब होते, मात्र संशय टाळण्यासाठी त्याने आपला लूक पूर्णपणे बदलल्याची माहिती समोर आली आहे... टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करून फरार होताना त्याचे केस किंचित वाढलेले होते... आरोपीने ओळख लपवण्यासाठी आखलेली ही तयारी तपास यंत्रणांसमोर आता उघड होत असून, या कटामागील प्रत्येक धागादोरा पोलिस तपासत आहेत.