लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण मिळालंय... यातील आरोपी सियाचा एक व्हिडिओ आता समोर आलाय.. होणाऱ्या पत्नीच्या लाईफस्टाईलबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी माहिती लपविल्याचा आरोप केतनच्या आईने केलाय.. सियाचे आई-वडील आणि तिच्या काही जवळच्या नातेवाईकांनी सियाच्या पार्टी गर्ल लाईफस्टाईल बद्दल आणि तिच्या दारू पिण्याच्या सवयींबद्दल आमच्यापासून खरी माहिती पूर्णपणे लपवून ठेवली, असा खळबळजनक दावा केतनच्या आईने केला आहे.